पुण्यातील साखर संकुलसमोर शिवसेनेचे 'रसवंती आंदोलन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:36 IST2019-01-15T19:35:46+5:302019-01-15T19:36:14+5:30
ऊस गाळप सुरु होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला

पुण्यातील साखर संकुलसमोर शिवसेनेचे 'रसवंती आंदोलन'
माजलगाव (बीड ) : शिवसेनेच्या वतीने माजलगाव मतदारसंघातील तिन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या ऊसाची बिल अदा न केल्यामुळे पुणे येथील साखर संकुल, साखर आयुक्त कार्यालयासमोर आज सकाळी 11 वाजल्यापासून 'रसवंती आंदोलन' करण्यात येत आहे. तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शिवसैनिकांचा या आंदोलनात सहभाग आहे.
माजलगाव मतदारसंघातील जय महेश साखर कारखाना पवारवाडी, छत्रपती सहकारी साखर कारखाना सावरगाव आणि लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव या तिन्ही कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या ऊस गाळपास सुरुवात केली मात्र दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला असून कारखान्यांना 15 दिवसात ऊस बील देणे देणे बंधनकारक असताना देखिल अद्याप शेतकऱ्यांना ऊस बीलाचे पैसे न मिळाल्याने या तिन्ही कारखान्यांच्या विरोधात शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, शिवसैनिक आणि शेकडो शेतकऱ्यांचे आज पासून शिवाजीनगर पुणे येथील साखर संकुल साखर आयुक्त कार्यालयासमोर 'रसवंती आंदोलन' करण्यात येत आहे.
आंदोलनात वडवणी तालुकाप्रमुख संदीप माने, रामदास ढगे , दयानंद शिंदे, नामदेव सोजे, मुंजाबा जाधव, तिर्थराज पांचाळ, अनिल धुमाळ, हनुमान सरवदे, उध्दव धुमाळ, महेश खेटे, गजानन गिराम, महादेव सुरवसे, गणेश राऊत, निलेश मुळे, गणेश शिंदे, शिवाजी सावंत, जयराम राऊत, नाना बामपारे, गोविंद काळे, करण थोरात आदींचा सहभाग आहे.