महामार्गावरील काम शिवसेनेने केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:51+5:302021-02-07T04:31:51+5:30
धारुर : खामगाव - पंढरपूर महामार्गावरील धारुर ते तेलगाव रस्त्यावर अरणवाडी साठवण तलावाजवळ सुरू असलेले रस्त्याची उंची वाढविण्याचे काम ...

महामार्गावरील काम शिवसेनेने केले
धारुर
: खामगाव - पंढरपूर महामार्गावरील धारुर ते तेलगाव रस्त्यावर अरणवाडी साठवण तलावाजवळ सुरू असलेले रस्त्याची उंची वाढविण्याचे काम चांगल्या दर्जाचे करावे, अशी मागणी करीत शिवसेनेच्या वतीने शनिवारी दुपारी हे काम बंद पाडण्यात आले. हा रस्ता अंदाजपत्रकाप्रमाणे रुंद व उंच केल्याशिवाय सुरू करू नये, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
खामगाव-पंढरपूर राज्य महामार्गावर आरणवाडी साठवण तलावाजवळ रस्ता उंचीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निवेदन शिवसेनेने दिले होते. शिवसेनेच्या निवेदनामुळे संबंधित गुत्तेदार व अभियंता यांनी घटनास्थळावर भेट घ्यावी लागली. यावेळी रस्ता मोजमाप करून संबंधित अंदाजपत्रकानुसार काम अभियंत्याच्या उपस्थितीत काम करावे, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी तालुका प्रमुख नारायण कुरुंद, संबंधित अभियंता भास्कर ग्लोबल, तालुका संघटक राजकुमार शेटे, उपतालुका प्रमुख बंडू सावंत, उपशहर प्रमुख नितीन सद्दीवाल, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अरुण चोपडेसह शिवसैनिक उपस्थित होते.
प्रत्यक्ष कामाची पाहणी करीत हे काम दर्जेदार केल्याशिवाय सुरू करू नये, हे काम दर्जेदार व अंदाजपत्रकाप्रमाणेच करावे, आशी मागणी करीत हे काम बंद केले. संबंधित गुत्तेदाराने दुसरा गुत्तेदार न देता स्वतः हे काम करावे व पुढील अनर्थ टाळावा, अशी मागणी केली आहे.