भाजपाच्या पाठींब्यावर शिवसेनेचा सभापती; धारूर नगर परिषदेत पुन्हा युती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 18:05 IST2021-01-22T18:05:11+5:302021-01-22T18:05:36+5:30
धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्व

भाजपाच्या पाठींब्यावर शिवसेनेचा सभापती; धारूर नगर परिषदेत पुन्हा युती
धारूर : धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीची निवडणूकीत भाजपने वर्चस्व सिद्ध केले. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या एका नगरसेवकास पाठिंबा देत त्यांची सभापती पदी निवड केली आहे.
धारूर नगर परिषदेच्या स्थायी समितीच्या निवडीसाठी भुसंपादन अधिकारी भारती सागरे या पिठासन अधिकारी म्हणून उपस्थित होत्या. त्यांना प्रभारी मुख्याधीकारी सुहास हजारे यांनी साहाय्य केले. निवडणुकीत सर्व विषय समित्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाला. सभापती पदसिध्द नगराध्यक्ष - डॉ. स्वरुपसिंह हजारी, पाणी पुरवठा सभापती पदासिध्द उपाध्यक्ष - मिनाक्षी गायकवाड, बांधकाम व नियोजन सभापती - ज्योती सिरसट, महिला व बालकल्याण सभापती - रंजना चव्हाण, तर सार्वजनिक आरोग्य,दिवाबत्ती व शिक्षण सभापती पदी शिवसेनेचे दत्तात्रय सोनटक्के यांची भाजपच्या पाठिंब्यावर निवड करण्यात आली. स्थायी समीती सदस्य पदी भाजपाचे गटनेते रोहीत हजारी यांची निवड झाली. सर्व समित्या भाजपाच्या ताब्यात आहेत.