शिवसेनेचे वाघ आपसात भिडले; बीड जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:47 IST2021-06-24T13:45:44+5:302021-06-24T13:47:11+5:30
माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.

शिवसेनेचे वाघ आपसात भिडले; बीड जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवरून दोन गटात राडा
माजलगाव ( बीड ) : माजलगाव येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान जिल्हाध्यक्ष जाधव शहरात येताच त्यांच्या स्वागताच्या मिरवणुकीदरम्यान शिवसेनेचे शहराध्यक्ष पापा सोळुंके आणि जाधव यांच्या गटात तुंबळ मारामारी झाली. यात शहराध्यक्ष पापा सोळुंके यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ( Shiv Sena activist clash in Beed )
माजलगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांची दोन दिवसापूर्वी माजलगाव परळी व केज तालुक्याच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती. यांची निवड होताच शहर प्रमुख धनंजय उर्फ पापा सोळुंके यांनी सोशल मीडियावर याचा निषेध नोंदवत शिवाजी चौकामध्ये निषेध नोंदवला होता. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अप्पासाहेब जाधव हे मुंबईहून आले असता त्यांची केसापुरी वसाहत या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान पापा सोळंके व त्यांचे साथीदार यांनी संभाजी चौकात वंगण घेऊन जाऊन मिरवणूक दरम्यान फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जिल्हाध्यक्ष जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी पापा सोळुंके व त्यांच्या साथीदारांना मारहाण केली. यावेळी पापा सोळुंके यांना जबर मार लागला असल्याची माहिती आहे.