बीड शहरातील टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी ‘शक्ती’ पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 12:19 AM2019-10-03T00:19:26+5:302019-10-03T00:19:59+5:30

शहरात मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीला येणाऱ्या मुलींना छेडण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून ‘शक्ती’ पथकाची स्थापना बुधवारी करण्यात आली.

'Shakti' squad for the settlement of the twin towers in Beed city | बीड शहरातील टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी ‘शक्ती’ पथक

बीड शहरातील टवाळखोरांच्या बंदोबस्तासाठी ‘शक्ती’ पथक

Next
ठळक मुद्देहर्ष पोद्दार : शाळा, महाविद्यालय परिसरात रोज होणार गस्त; आरोपीचे तांत्रिक रेकॉर्ड तयार करुन केली जाणार प्रतिबंधात्मक कारवाई

बीड : शहरात मागील काही दिवसांपासून शाळा, महाविद्यालय व खासगी शिकवणीला येणाऱ्या मुलींना छेडण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी शहरातील विविध पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर प्रभावी कारवाई व्हावी, यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या संकल्पनेतून ‘शक्ती’ पथकाची स्थापना बुधवारी करण्यात आली.
‘शक्ती’ पथक पोलीस अधीक्षक यांनी फलकाचे अनावरण करुन कार्यान्वित केले. यावेळी पोलीस उपाधीक्षक भास्कर सावंत, ‘शक्ती’ पथक प्रमुख मपोउपनि अश्विनी कुंभार, मपोना प्रतिभा चाटे, ज्योती सानप, काजल वीर, राहुल पाईकराव हे उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले. हे पथक बीड शहरातील सर्व महाविद्यालय, विद्यालय व खासगी शिकवणीच्या परिसरामध्ये गस्त घालणार आहे. तसेच त्यांच्याकडे तक्रार आली तर तात्काळ कारवाई केली जाईल.
यावेळी टवाळखोर मुले जर मुलींची छेडछाड करत असतील तर त्यांना पकडून त्यांच्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाºयाचे रेकॉर्ड तयार केले जाणार आहे. यामध्ये जर एकाच गुन्ह्यात पुन्हा-पुन्हा आरोपी तोच व्यक्ती असेल तर त्याच्यावर इतर कारवाया देखील केल्या जाणार आहेत, अशी माहिती पोद्दार यांनी यावेळी बोलताना दिली. त्यामुळे पुढील काळात रोडरोमिओ आणि छेडछाड करणाºया टवाळखोरांची गय केली जाणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

Web Title: 'Shakti' squad for the settlement of the twin towers in Beed city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.