सेरो सर्वेक्षण; नागरिकांचे घेतले रक्तनमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST2021-06-22T04:23:20+5:302021-06-22T04:23:20+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी आयसीएमआरकडून सेरो सर्वेक्षण केले ...

सेरो सर्वेक्षण; नागरिकांचे घेतले रक्तनमुने
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी आयसीएमआरकडून सेरो सर्वेक्षण केले जात आहे. यात सोमवारी हे पथक बीडमध्ये आले. जिल्ह्यातील बीड तालुक्यातील येळंबघाट, आंबेसावळी, पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, आष्टी तालुक्यातील डोंगरगन, गेवराई तालुक्यातील पांढरवाडी, माजलगाव तालुक्यातील एकदरा, धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द, परळी तालुक्यातील धर्मापुरी, माजलगाव शहरातील वॉर्ड क्र. ४, केज शहरातील वॉर्ड क्र. ७ येथील नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले. याचा अहवाल आठवडाभरानंतर प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले. सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह टीमने या पथकाला रक्तनमुने घेण्यासाठी सहकार्य केले.
---
पांढरवाडीत उपसंचालकांची भेट
याच सर्वेक्षणाच्या निमित्ताने उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी पांढरवाडी गावाला भेट देत आढावा घेतला. तसेच सरपंच व ग्रामस्थांशी संवाद साधत कोरोनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
210621\21_2_bed_27_21062021_14.jpeg
===Caption===
पांढरवाडी ग्रामस्थांशी संवाद साधताना उपसंचालक डॉ.एकनाथ माले. सोबत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी दिसत आहेत.