शिखर गाठण्यासाठी स्वप्रयत्न हवे : मल्लिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:31 IST2020-12-29T04:31:15+5:302020-12-29T04:31:15+5:30
बीड : नारायणा इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या ऑनलाइन सेमिनारला विद्यार्थी आणि पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा ...

शिखर गाठण्यासाठी स्वप्रयत्न हवे : मल्लिक
बीड : नारायणा इन्स्टिट्यूटने आयोजित केलेल्या ऑनलाइन सेमिनारला विद्यार्थी आणि
पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या कुठल्याही
क्षेत्रामध्ये स्पर्धा दिसून येते. येथे प्रत्येक जण उंच भरारीचे
स्वप्न बघतो; पण फारच थोडे लोक स्वप्रयत्नांनी यशाचे शिखर गाठतात, असे मत
नारायणाचे स्थानिक शाखेचे संचालक डॉ. एम.एफ. मल्लिक यांनी व्यक्त केले.
नारायणाने आयोजित केलेल्या ऑनलाइन सेमिनारमध्ये इयत्ता दहावीचे
विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी
प्रो. विशाल लदनिया यांनी यशस्वी भविष्यासाठी
स्पर्धात्मक परीक्षेवर बोलत नारायणाबदल माहिती दिली. नारायणा
संस्थेच्या मजबूत कार्यपद्धतीमुळेच महामारीच्या काळात सुद्धा संस्थेने
अखंडित सेवा प्रदान केली असल्याने पालकांची प्रथम पसंती नारायणा हीच ठरल्याचे ते म्हणाले.
डी. आर. जाधव यांनी आभार मानले.
१० वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षीय अभ्यासक्रमाकरिता
प्रवेशासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे वेळापत्रक १० फ्रेबुवारी रोजी जाहीर होणार
असल्याचे डॉ. मल्लिक यांनी सांगितले. प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन
नोंदणीकरिता ९३७२२३३९३६/३७/३८ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. एम. एफ. मल्लिक, प्रो. विशाल लदनिया, प्रा. दुर्गेश सिंग, प्रा. गोधन सिंग, प्रा. अब्दुल
हन्नान, प्रा. सुनील झा, प्रदीप शुक्ला, जिशान अहमद, प्रा. संजय सिंग,
प्रा. प्रशांत शुक्ला, प्रा. दिलेश्वर राव, प्रा. संदीप मिश्रा,
प्रा. आलोक कुमार, प्रा. डी. मुखाती यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी राजेश पाटील, दत्ता जाधव, अब्दुल हाफीज,
भक्ती देशपांडे, कल्पना नरोडे, जमील खान, नवाज बेग, प्रदीप मिश्रा, चलपती,
जितू पाटील, कुमार, कृपा जाधव आदींनी परिश्रम घेतले.
(वाणिज्य वार्ता)