कृषी रोपवाटिकेतील रोपे पाण्याअभावी जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:42+5:302021-05-24T04:31:42+5:30
विविध फळझाडांची रोपे : दुर्लक्ष झाल्याचा आरोप बीड : कृषी विभागाच्या शासकीय कृषी कार्यालय धानोरा रोड बीड परिसरातील रोपवाटिकेत ...

कृषी रोपवाटिकेतील रोपे पाण्याअभावी जळाली
विविध फळझाडांची रोपे : दुर्लक्ष झाल्याचा आरोप
बीड : कृषी विभागाच्या शासकीय कृषी कार्यालय धानोरा रोड बीड परिसरातील रोपवाटिकेत विविध फळझाडांची कलम केलेली रोपे दरवर्षी तयार करण्यात येतात. मात्र, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे याठिकाणचे हजारो कलम केलेली रोपे जळून गेली आहेत.
शहरातील धानोरा रोड परिसरात असलेल्या शासकीय कृषी कार्यालयात रोपवाटिकेमध्ये हजारो कलम केलेली झाडे जागेवरच पाण्याअभावी वाळून गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे शासनाचा पैसा वेळ वाया जातो. जून महिन्यात पाऊस पडल्यावर मोठ्या प्रमाणावर या झाडांना मागणी असते. आंबा, चिंच, बोर, जाब, चक्कु, लिंबू, मोसंबी, बदाम, डाळिंब, सीताफळ, कवट, फणस, आदी झाडांच्या रोपांना मागणी असते. कृषी कार्यालयामार्फत मोठा निधी उपलब्ध करून रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची कलमे तयार करून ठेवण्यात आलेली आहेत. मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या झाडांना पाणी न दिल्याने कलम केलेली हजारो झाडे जागेवरच जळून गेली आहेत. त्यामुळे त्याठिकाणी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
===Photopath===
220521\503022_2_bed_13_22052021_14.jpg
===Caption===
कृषी विभागातील रोपवाटीकेत जळून गेलेले रोपं