जिल्ह्यात कुपोषित बालकांची धडक शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:40 IST2021-08-18T04:40:14+5:302021-08-18T04:40:14+5:30

बीड : मागील दीड वर्ष कोरोनामुळे थांबलेली ० ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांची धडक शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात ...

Search operation for malnourished children in the district | जिल्ह्यात कुपोषित बालकांची धडक शोधमोहीम

जिल्ह्यात कुपोषित बालकांची धडक शोधमोहीम

बीड : मागील दीड वर्ष कोरोनामुळे थांबलेली ० ते ६ वर्षे वयोगटातील कुपोषित बालकांची धडक शोध मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत असून मागील महिन्यापर्यंत जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची संख्या १२९ असून मोहिमेनंतर आकडा वाढतो की स्थिर राहतो हे स्पष्ट होणार आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार १५ ते ३१ ऑगस्टदरम्यान ही मोहीम राबविली जात आहे. यात शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके, किशोरी मुली, गरोदर, स्तनदा मातांची सखोल आरोग्य तपासणी, लसीकरण तसेच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांचा शोध घेतला जाणार आहे. सीईओ अजित कुंभार यांनी या मोहिमेसाठी संबंधित वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना योग्य त्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.

सॅम व मॅम शोधासाठी स्क्रिनिंग

या आदेशानुसार ० ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. या बालकांचे वजन, उंची, लांबी घेतल्यानंतर तफावतीनुसार नोंद केली जाणार आहे. २ वर्षांपेक्षा कमी किंवा ८७ सेंटिमीटरपेक्षा कमी लांबी मापन असलेल्या बालकांची लांबी इन्फन्टोमीटरवर घेण्यात येणार आहे. उर्वरित बालकांची उंची स्टेडिओमीटरवर घेतली जाणार आहे. स्क्रिनिंगसाठी अनुपस्थित बालकांची वैद्यकीय अधिकारी पथकासह प्रत्यक्ष घरी भेट देऊन स्क्रिनिंग करतील तसेच बालकांचे वजन सॉल्टर वजन काट्याने मोजणार आहेत.

-----------

या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी सॅम बालकांचे प्रमाणीकरण केलेल्या सूचीनुसार आरोग्य समस्या किंवा पायावर सूज आलेल्या बालकांना एआरसी किंवा सीटीसीमध्ये संदर्भीत करतील तर उर्वरित सॅम बालकांची निवड यादी ग्रामबालविकास केंद्रासाठी अंतिम करण्यात येणार आहे. रक्तक्षय व जन्मत: कमी वजनाच्या बालकांची यादी तयार करून त्यांची आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे.

----------

कुपोषित बालके शोधण्याच्या धडक मोहिमेत कोणीही अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहणार नाही, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी संनियंत्रण करावे. बालकांची आरोग्य तपासणी, लसीकरण व सॅम आणि मॅम बालकांच्या शोध मोहिमेदरम्यान कोणीही टाळाटाळ, दुर्लक्ष केल्यास किंवा कर्मचारी गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे. -- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. बीड.

Web Title: Search operation for malnourished children in the district