अपहृत पीडित मुलींचा तीन तासांत शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:19+5:302021-01-13T05:27:19+5:30
बीड : शहरातील अल्पमुदती निवासगृहात असलेल्या दोन पीडित मुलींनी कचरा टाकण्याच्या बहाण्याने बाहेर येत धूम ठोकली. यात अपहरणाचा गुन्हाही ...

अपहृत पीडित मुलींचा तीन तासांत शोध
बीड : शहरातील अल्पमुदती निवासगृहात असलेल्या दोन पीडित मुलींनी कचरा टाकण्याच्या बहाण्याने बाहेर येत धूम ठोकली. यात अपहरणाचा गुन्हाही नोंद झाला. त्यानंतर वडवणी पोलिसांनी अवघ्या पाच तासांत त्यांचा शोध घेतला. त्यांना पुन्हा अल्पमुदती निवासगृहात पाठविण्यात आले आहे. पीडित महिला व मुलींसाठी बीड शहरातील नगर रोड परिसरात अल्पमुदती निवासगृह आहे. याच निवासगृहातून शनिवारी सकाळच्या सुमारास कचरा टाकण्याच्या बहाण्याने दोघीही बाहेर पडल्या. बराच वेळ झाल्यानंतरही त्या परत न आल्याने येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला; परंतु त्या मिळाल्या नाहीत. मग अज्ञात व्यक्तीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या तीन तासांत या मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. एका मुलीला वडवणी शहरातून, तर दुसरीला याच तालुक्यातील रुई गावातून ताब्यात घेतले. दोघींनाही शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तेथून पुन्हा अल्पमुदती निवासगृहात पाठविण्यात आले.
ही कारवाई वडवणीचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर, बीडच्या पोउपनि. मीना तुपे, वडवणीचे पोउपनि. जयसिंग परदेशी, पोना. मनोज जोगदंड, पोशि. लहू वाघमारे, होमगार्ड प्रवीण वाघमारे आदींनी केली.