केज : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने आवाहन करूनही शहरातील काही व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी केली नाही. या व्यापाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कठोर कारवाईचा बडगा उगारत चार दुकाने सील केली. तहसीलदार, नायब तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली.
काेरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. शहरातील ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना तपासणी करून घेतली नाही किंवा शासनाचे आदेश पाळले नाहीत, अशा व्यावसायिकांवर शुक्रवारी तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुहास हजारे, सचिन देशपांडे आणि प्रभारी मुख्याधिकारी सावंत यांच्या पथकाने कठोर कारवाई करत चार दुकाने सील केली. यात एक किराणा, एक ऑटोमोबाईल व दोन कापड दुकानांचा समावेश आहे. शनिवारी हे पथक पथविक्रेत्यांची तपासणी करणार आहे. व्यापाऱ्यांनी कोविड तपासणी न केल्यास त्यांना प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. व्यापारी व नागरिकांनी वेळोवेळी प्रशासनाने जारी केलेले कोरोनाबाबतचे नियम पाळावेत, मास्क, सॅनिटायझर आणि गर्दी टाळावी अन्यथा कारवाई अटळ असल्याचे तहसीलदार दुलाजी मेंडके यांनी सांगितले.
===Photopath===
190321\deepak naikwade_img-20210319-wa0034_14.jpg