शालेय पोषण आहार कामगार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:31 IST2021-02-07T04:31:40+5:302021-02-07T04:31:40+5:30

: महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेची बैठक होऊन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण डोंगरे ...

School Nutrition Workers Union executive announced | शालेय पोषण आहार कामगार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

शालेय पोषण आहार कामगार संघटनेची कार्यकारिणी जाहीर

: महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेची बैठक होऊन तालुका कार्यकारिणी निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण डोंगरे तर सचिवपदी लता खेपकर यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरचिटणीस कॉ. डॉ. अशोक थोरात, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष काॕॅ. मोहन लांब, कॉ. मीरा शिंदे, कॉ. भागवत जाधव, कॉ. मनिषा करपे आदी उपस्थित होते. या बैठकीत संघटनाबांधणी व मजबूतीकरण या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष सुनिता डोईफोडे, महादेव गायकवाड, कार्याध्यक्ष वैशाली आरसुळ, सहसचिव कॉ. संगीता थोरात, जयश्री सोळंके , सल्लागार कॉ. शोभा सोळंके, सदस्य किशन मुठाळ, सारिका सोनटक्के, गंगा फडताडे, विलास काळे, संजय घोगरे, शिवाजी आरसुळ, देविदास पंचाळ, सुरेखा निर्मळ, शिवकन्या शिराळे, भागीरथी कोळी, कुसुम उजगरे आदींचा समावेश आहे. यावेळी सूत्रसंचालन बाळराजे सोळंके यांनी केले. या बैठकीला तालुक्यातील १०५ पेक्षा जास्त सभासद उपस्थित होते

Web Title: School Nutrition Workers Union executive announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.