शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

शाळकरी मुलाच्या दप्तरात ‘एअरगन’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:46 IST

शहरातील जुन्या भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याजवळ एअरगन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बाहेर गावठी कट्टयाची अफवा पसरल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती ती एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे दैनंदिन व्यापात पालकांचे आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठळक मुद्देअंबाजोगाईत खळबळ : विद्यार्थी, पालकांना ताकीद

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शहरातील जुन्या भागातील एका नामांकित शैक्षणिक संस्थेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याजवळ एअरगन आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. बाहेर गावठी कट्टयाची अफवा पसरल्याने पोलिसांनी तातडीने दखल घेत या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीअंती ती एअरगन असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेमुळे दैनंदिन व्यापात पालकांचे आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत आहे का? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.सदरील विद्यार्थी दोन दिवसांपासून शाळेत येताना एअरगन सोबत घेऊ येत होता. परंतु, ही एअरगन नसून गावठी कट्टा असल्याची अफवा अन्य विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये पसरली. ही बाब शिक्षकांच्या कानावर गेल्यानंतर हादरलेल्या शिक्षकांनी मंगळवारी त्वरित सदरील विद्यार्थ्याच्या पालकांना बोलावून घेतले आणि पाल्याकडे लक्ष देण्याची समज दिली. पालकानेही शिक्षकांची माफी मागत प्रकरण मिटविले. मात्र, या घटनेबाबत अंबाजोगाई शहर पोलिसांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने शाळेत जाऊन शिक्षक आणि पालकांना बोलावून घेऊन या प्रकारणाची सखोल चौकशी केली.प्रकरण वाढल्याचे लक्षात आल्याने या विद्यार्थ्याच्या भेदरलेल्या पालकाने ही एअरगन असून आपण ती एका कृषीप्रदर्शनातून खरेदी केली असल्याचे सांगितले. तसेच, सध्या दसºयानिमित्त घरातील सर्व सामान बाहेर काढले असता ही बंदूक मुलाच्या हाती लागली आणि त्याने ती शाळेत केवळ करमणुकीच्या उद्देशाने आणली असा खुलासा करत धाय मोकलून रडत पोलिसांचे पाय धरले. पालकाची केविलवाणी अवस्था पाहून पोलिसांनी त्यांना पाल्याकडे बारकाईने लक्ष देण्याची सक्त ताकीद आणि समज दिली.या घटनेमुळे दोन दिवसांपासून अन्य पालकात मात्र दहशतीचे वातावरण पसरले होते.शिक्षक, पालकांचे मुलांकडे दुर्लक्षआपला पाल्य शाळेत काय घेऊन जात आहे आणि काय करत आहेत याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे अनेक घटनांतून निदर्शनास येत आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या शाळेतील वागणुकीकडे शिक्षक गांभीर्याने लक्ष देत नाहीत असे नेहमीच आढळून येते. अनेक शिक्षक बहुतांशी वेळ मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसत असल्याचेही अनेक पालकांनी सांगितले. दोन्ही गोष्टींचा परिणाम विद्यार्थ्यांची मानसिकता आणि अभ्यासावर होत असल्याने ते चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या घटनेपासून पालक आणि शिक्षकांनीही बोध घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीSchoolशाळाPoliceपोलिस