हरणाच्या पाडसाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:23 IST2021-06-26T04:23:33+5:302021-06-26T04:23:33+5:30
डिघोळ अंबा गावातील प्रदीप घुंडरे यांना त्यांच्या शेतात चिंकारा जातीच्या हरणाचे नवजात पाडस सापडले. त्यांनी अंबाजोगाई येथील सर्पमित्र लाखे ...

हरणाच्या पाडसाला जीवदान
डिघोळ अंबा गावातील प्रदीप घुंडरे यांना त्यांच्या शेतात चिंकारा जातीच्या हरणाचे नवजात पाडस सापडले. त्यांनी अंबाजोगाई येथील सर्पमित्र लाखे यांना संपर्क करून या पाडसाला जीवदान देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. दोन, तीन दिवसांपूर्वी जन्म झालेले हे पाडस असल्याने दूधाशिवाय दुसरे कोणतेही अन्न देता येणार नव्हते. सर्पमित्र लाखे व त्यांच्या कुटुंबीयांनी या पाडसाला लहान बाळाप्रमाणे सांभाळत डॉ. प्रा. राजकुमार थोरात यांच्या मदतीने अंबाजोगाई वनविभागाशी संपर्क केला. अंबाजोगाई वनपरिक्षेत्र अधिकारी कस्तुरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाडसाला अधिकृतपणे वनविभागाच्या ताब्यात घेतले.
याप्रसंगी वन अधिकारी कस्तुरे, सर्पमित्र प्रा. राजकुमार थोरात, भैरव लाखे व मुक्ता लाखे, हेमंत धानोरकर, ओजस, ईश्वर चाटे व वन कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
250621\avinash mudegaonkar_img-20210623-wa0010_14.jpg