शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुदर्शन घुलेचा मोबाइल लॉक; सीआयडी पुन्हा करणार कसून चौकशी, आणखी पुरावे सापडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 08:33 IST

अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले याला न्यायालयीन कोठडीतून काढून पुन्हा एकदा ३१ जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी मिळाली आहे. त्याच्या जप्त दोनपैकी एका मोबाइलचे लॉक उघडत नाही, तसेच इतरही टेक्निकल पुरावे हाती लागले असून, त्याचाही तपास सीआयडी करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटने या प्रकरणात आणखी ट्विस्ट आला असून, त्यांनी आरोग्य विभागावरही आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. यात सुदर्शन घुले, वाल्मीक कराडसह नऊ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील कृष्णा आंधळे अजूनही मोकाट आहे.  याच प्रकरणात वाहनांसह मोबाइल जप्त केले आहेत. यात घुलेच्या दोन मोबाइलचाही समावेश आहे. त्यातील एका मोबाइलचे लॉक उघडत नाही. त्यासह इतरही तपास करायचा असल्याने सीआयडीने घुलेच्या कोठडीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. १० दिवसांची कोठडी मागितली होती. यात आरोपी व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत त्याला ३१ जानेवारीपर्यंत कोठडी दिली आहे. इतर सातही आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, बीडच्या कारागृहात आहेत. 

कराडच्या जवळचे कोण?दमानिया यांनी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी, कर्मचारी हे वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप केला आहे. २६ लोकांची यादीच त्यांनी व्हायरल केली आहे. या अगोदर एलसीबीतील उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा फोटो कराडसोबत व्हायरल झाल्याने एसआयटी पथक बरखास्त करण्यात आले होते.

अंजली दमानियांच्या ट्वीटने ट्विस्टवाल्मीक कराड याला जिल्हा रुग्णालयात स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचा आरोप करत अंजली दमानिया यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर आरोप केले. त्यांचे अंबाजोगाईत हॉटेल आहे.तत्कालीन आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे ते ओएसडी होते. बीडहून नाशिकला बदली झाल्यावर त्यांना पुन्हा आशीर्वाद देऊन बीडला आणल्याचा दावा त्यांनी केला, तर दुसऱ्या बाजूला डॉ. थोरात यांनी हे आरोप फेटाळले आहेत.आपण २२ ते ३० जानेवारीपर्यंत रजेवर असून, बीड व परळीच्या डॉक्टरांसमवेत विदेशात आल्याचे सांगितले. याचे पुरावेही डॉ. थोरात यांनी माध्यमांना दिले. 

घुलेनंतर आठवले गँगवरही मकोकामध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून गोळीबार केल्या प्रकरणातील आरोपी आठवले गँगवर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील कलमांचा अंतर्भाव करून मकोका लावण्यात आला आहे. टोळीतील चार आरोपी अटक असून दोघे अजूनही फरार आहेत. सोमवारी बीड पोलिसांनी ही माहिती दिली. सरंपच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी बीड शहरातील बार्शी नाका भागात आठवले गँगने विश्वास डोंगरे यांच्या घरात घुसून गोळीबार केला होता. याप्रकरणी पेठबीड पोलिस ठाण्यात १३ डिसेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता.   

कुख्यात आठवले गँगमध्ये कोण कोण आहेत सदस्य?आठवले गँगचा प्रमुख हा अक्षय श्याम आठवले (२८) हा आहे. त्यात मनीष ऊर्फ प्रतीक प्रकाश क्षीरसागर (२५), ओंकार सिद्धार्थ सवई (२५), प्रसाद मोतीराम धिवार, सनी श्याम आठवले आणि आशिष श्याम आठवले यांचा समावेश आहे. यातील फरार सनी आठवले याने पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ आणि वाल्मीक कराड यांचे कथित कॉल रेकॉर्डिंगही व्हायरल केले होते. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडwalmik karadवाल्मीक कराडBeed policeबीड पोलीस