शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Beed: संतोष देशमुख यांची हत्या ते आरोपींवर २१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:17 IST

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्याप्रकरण; वाल्मीक कराडसह सात आरोपींवर दोषारोप निश्चित; जिल्हा न्यायालयात होणार ८ जानेवारीला पुढील सुनावणी

बीड : राज्यभरात गाजलेल्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील वाल्मीक कराडसह सातही आरोपींवर बीड येथील विशेष ‘मकोका’ न्यायालयाने मंगळवारी दोषारोप निश्चित केले. त्यामुळे या खून प्रकरणास आता गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

बीड जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीदरम्यान ‘फॉरेन्सिककडे असलेल्या लॅपटॉपमधील डेटाची प्रत मिळेपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये’ आणि ‘चार्ज फ्रेम करण्यापूर्वी अतिरिक्त पुरावा देण्यात यावा’ अशी मागणी बचाव पक्षाने केली. तसेच आरोपी प्रतीक घुले याच्या नवीन वकिलाने पेन ड्राईव्हमधील माहिती पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला. वारंवार वकील बदलणे आणि वेळकाढू धोरण अवलंबिण्यावरून न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘प्रत्येक तारखेला असं व्हायला नको, वारंवार वकील बदलून तीच ती कारणे दिली जात आहेत,’ अशा शब्दांत न्यायालयाने आरोपींना सुनावले. दरम्यान, सर्व आरोपींनी आरोप नाकारल्यामुळे आता या प्रकरणाची नियमित सुनावणी आणि साक्षीदारांच्या साक्ष घेण्याची प्रक्रिया ८ जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सात आरोपींवर काय आहेत आरोप?न्यायालयाने आरोपींवर असलेले आरोप वाचून दाखवले. खंडणी मागणे, खुनाचा कट रचणे, खून करणे, धमकाणे, जातिवाचक शिवीगाळ करणे, पुरावे नष्ट करणे, मकोका कायद्यांतर्गत संघटित गुन्हेगारी करणे, अशा आरोपांचा समावेश आहे.

कराड बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवलेमकोका न्या. व्ही. एच. पाटवदकर यांनी ‘तुम्हाला तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का?’ असे सर्व आरोपींना विचारले, तेव्हा मुख्य आरोपी वाल्मीक कराड याच्यासह सर्व सातही आरोपींनी ‘आरोप मान्य नसल्याचे’ सांगितले. या दरम्यान, आरोपी वाल्मीक कराड याने त्याचे म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र न्या. पाटवदकर यांनी आरोपी कराड यास केवळ फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’मध्ये उत्तर देण्यास सांगितले.

आरोप निश्चित झाल्यामुळे चाप बसलाविशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, न्यायालयाने वाल्मीक कराड व त्यांच्या गँगच्या विरुद्ध आज आरोप निश्चित केलेले आहेत. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचा कट करून संगनमताने आरोपींनी खून केला आणि त्याचप्रमाणे यातील काही पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी आजही पुन्हा हे आरोप निश्चितीची सुनावणी लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न बचाव पक्षाने केला. खटल्यात वेळोवेळी वेगवेगळे हातखंडे वापरून डी टू ऑपरेशन म्हणजेच उशीर करणे आणि खटला उलथवून लावणे, असे प्रयत्न होते, त्याला आज आरोप निश्चित झाल्यामुळे चाप बसलेला आहे. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला विचारले की तुमच्याविरुद्ध हे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. त्यावर सर्व आरोपींनी आरोप मान्य नाहीत, असे सांगितले आहे. न्यायालयाने त्याकरिता ते रेकॉर्ड जेलमध्ये पाठवले असून, जेलमधून त्यांची स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा खटल्याच्या कामाला सुरुवात होईल.

थोडक्यात घटनाक्रम: ६ डिसेंबर २०२४ : मस्साजोगमध्ये वाद९ डिसेंबर २०२४ : संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून१० डिसेंबर २०२४ : प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांना अटक१८ डिसेंबर २०२४ : विष्णू चाटे अटक३१ डिसेंबर २०२४ : वाल्मीक कराड ‘सीआयडी’ला पुण्यात शरण४ जानेवारी २०२५ : सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक२७ फेब्रुवारी २०२५ : न्यायालयात दोषारोपपत्र दाखल (८० दिवसांत)२३ डिसेंबर २०२५ : सर्वच सात आरोपींवर दोष निश्चीती२१ सुनावण्यांनंतर दोषनिश्चिती

English
हिंदी सारांश
Web Title : Santosh Deshmukh murder case: Charges framed after 21 hearings.

Web Summary : Beed court frames charges against seven accused in Santosh Deshmukh murder case. Trial delayed by defense tactics. Next hearing January 8, 2026. Accused deny charges.
टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याCrime Newsगुन्हेगारी