शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:39 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाबद्दल असमाधानी असलेल्या मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आता अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, पोलीस उप अधीक्षकांसह काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि कृष्णा आंधळेच्या अटक यासह एकूण ८ ते ९ मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आता अन्न त्याग आंदोलन करणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने मस्साजोग ते बीड अशी सद्भावना यात्रा काढली जाणार आहे.  

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! या आंदोलनाबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, "गावकऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यात सर्वानुमते अन्न त्याग आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. त्यात ८ ते ९ मागण्या आहेत. उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती, कृष्णा आंधळेला अटक कधी करणार, अशा मागण्या आहेत. त्या आंदोलनात मी सुद्धा सहभागी असणार आहे."

कसे असणार आंदोलनाचे स्वरूप?

"गावकऱ्यांचे शिष्टमंडळ बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे. त्यात मी सुद्धा असणार आहे. या मागण्यांसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करू", अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली. 

"या अन्न त्याग आंदोलनात गावकरी साखळी पद्धतीने सहभागी होतील. या ठिकाणी जितक्या लोकांची व्यवस्था असेल, तितके लोक पहिल्या दिवशी इथे बसतील. त्यात पुरुष महिला असतील. याचं नियोजन संध्याकाळी गावकरी करणार आहेत", असे धनंजय देशमुख यांनी सांगितले. 

काँग्रेस काढणार यात्रा 

काँग्रेसचे नवनियुक्ती प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धनंजय देशमुख यांची भेट घेतली. मस्साजोग ते बीड यात्रा काढणार असल्याचे त्यांनी धनंजय देशमुख यांना सांगितले.   

याबद्दल बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, "ते आले. आमचं सात्वंन केलं. विचारणा केली की, आमची एक संकल्पना आहे. त्या संकल्पनेवर तुमचं मत काय आहे. आम्हाला सात्वंनेसाठी कोण आलंय, हे बघितलं नाही. बघणार नाही. त्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करून सद्भावना यात्रेबद्दल कळवू. यात न्यायाची भूमिका घेण्याबद्दल आम्ही त्यांना मागणी करणार आहोत."

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखBeedबीडCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेस