न्याय मिळत नसल्याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मंगळवारपासून करणार अन्नत्याग आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 22:10 IST2025-02-24T22:10:28+5:302025-02-24T22:10:52+5:30
Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे न्याय मिलेपर्यंत देशमुख कुटुंबियांसह, महिला व गावकऱ्यांच्या सहभागाने मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व ग्रामस्तानी एकमताने जाहीर केली.

न्याय मिळत नसल्याने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीय मंगळवारपासून करणार अन्नत्याग आंदोलन
केज - तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी प्रशासनाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्यामुळे न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांसह, महिला व गावकऱ्यांच्या सहभागाने मंगळवारी सकाळी 10 वाजल्या पासून महादेव मंदिरासमोर सामूहिक अन्नत्याग आंदोलन सुरु होणार असल्याची घोषणा सोमवारी रात्री 9 वाजता झालेल्या बैठकीत सर्व ग्रामस्तानी एकमताने जाहीर केली.
25 फेब्रुवारी पासून सामूहिक अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार यांना यापूर्वीच देण्यात आले होते.परंतु सोमवारी रात्री 9 पर्यंत प्रशासनाकडून गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत त्यामुळे सामूहिक अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय गावाकऱ्यांनी घेतला आहे.
प्रशासनाच्या वतीने सहाय्यक महसूल अधिकारी डी एम मस्के यांना पत्र देण्यात आले असून त्यांना आदेश दिल्याची माहिती प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. तर अन्नत्याग आंदोलन स्थळी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली
झांजे महाराज व दीपक नागरगोजे यांची भेट
सोमवारी मस्साजोग येथे हभप भागचंद्र महाराज झांजे व शांतीवन संस्थेचे संस्थापक दीपक नागरगोजे यांनी भेट दिली. व धनंजय देशमुख सह सर्व गावाकऱ्यांशी संवाद साधला. व अन्नत्याग आंदोलनाला आपला पाठींबा जाहीर केला.
सुरेश धस यांचा बार फुसका
भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग येथे भेट देऊन आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु त्यांचा काहीही निरोप न आल्यामुळे आ सुरेश धस यांचा बार फुसका निघाल्याची चर्चा गावकरी करीत आहेत.