शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:40 IST

Santosh Deshmukh Case : दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली.

Santosh Deshmukh Case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, या प्रकरणात भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे त्यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. अशातच, दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबाने आज भगवान गडावर जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांना या प्रकरणातील सर्व पुरावे दाखवले. यावेळी वैभवी देशमुखने शास्त्रींना थेट सुनावले.

संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुखांच्या खूनामागील खरे कारण, आरोपींचा इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, त्यांच्यावरील गुन्ह्यांचा कच्चाचिठ्ठाचा महाराजांपुढे मांडला. यावेळी 'आपण माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, तमाम भक्तांचे गुरू आहात पण आपण केलेले विधान हे आम्हाला पटले नाही, अशा शब्दात दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुख हिने भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना ऐकवले.

वैभवी देशमुखने सुनावलेवैभवी म्हणाली, 'आम्ही बातम्यांमध्ये ऐकले, माझ्या वडिलांच्या अंगावर इतके वार झाले, त्यांचा एकही अवयव शाबूत ठेवला नाही. त्यांच्या अस्तीमध्येही फक्त तीन हाडे निघाले. आमची मानसिकता काय असेल? आज आमच्या वडिलांचे फोटो बघावे वाटत नाहीत. मला फक्त एवढे वाटते की, माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्यामागचे कारण काय, तेवढे समजून घ्यायला हवे होते, आमची बाजू ऐकायला पाहिजे होती आणि मगच वक्तव्य करायला पाहिजे होते.'

'गुन्हेगारी वृत्तीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ज्यांना आरोपींना समर्थन करायचे आहे, त्यांनी ते करावे, आम्ही त्यांच्याबाबत बोलत नाही. हे लोक जातीयवाद वाढवत आहेत. माझ्या वडिलांनी कधीच जातीवाद केला नाही. जो माणूस दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी गेला, त्याला न्याय मिळण्यात फाटे फुटत आहेत. आम्ही अजूनही दुखातून सावरू शकलो नाही. त्यांच्या न्यायासाठी आजही झुंझावे लागत आहे. ही घटना घडलीये, अशी पुढे घडू नये, त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,' असं वैभवी यावेळी म्हणाली. 

आरोपींना समर्थ नाही- नामदेव शास्त्री'मी तुमच्या पाठिशी आहे. हा प्रकार समाजातील वाईट लोकांनी केलेला आहे. तुम्ही भगवान गडाचे शिष्य आहात. मस्साजोग-केज तालुका बाबांना मानणारा आहे. माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल. मी कधीही गुन्हेगाराच्या पाठिशी नाही. भगवान गड आपल्या सदैव पाठिशी आहे. मी भगवान बाबाला प्रार्थना करतो, लवकर न्याय मिळावा. आरोपीचे कधीही समर्थन करत नाही. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ निघाला. महाराष्ट्राला विनंती आहे. या प्रकरणाला जातीय रंग न देता न्याय मिळावा, यासाठी प्रयत्न करावे,' असे स्पष्टीकरण नामदेव शास्त्रींनी दिले.

 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडCrime Newsगुन्हेगारी