संजय जाधव यांनी तोंड सांभाळून बोलावे - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST2021-08-13T04:38:33+5:302021-08-13T04:38:33+5:30

बीड : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तोंड सांभाळून भाषण करावे, अन्यथा समता सैनिक त्यांचे तोंड फोडल्याशिवाय राहणार ...

Sanjay Jadhav should keep his mouth shut - A - A | संजय जाधव यांनी तोंड सांभाळून बोलावे - A - A

संजय जाधव यांनी तोंड सांभाळून बोलावे - A - A

बीड : शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी तोंड सांभाळून भाषण करावे, अन्यथा समता सैनिक त्यांचे तोंड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा सज्जड इशारा समता परिषदेचे विभागीय तथा बीड जिल्हा अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.

जालना येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या जिल्हा मेळाव्यात बोलताना खा. संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर मनसोक्त तोंडसुख घेत असताना राज्याचे मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्याबद्दल अपशब्द वापरून जी चूक केली आहे, त्या चुकीची जाहीर माफी मागावी. बापासमान असलेल्या भुजबळांबद्दल अपशब्द वापरण्याची ज्याची लायकी नाही, अशा खा. संजय जाधव यांनी जाहीर माफी मागितली नाही तर समता सैनिक महाराष्ट्रात दिसेल तेथे त्यांचे तोंड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असा सज्जड इशारा ॲड. सुभाष राऊत यांनी दिला आहे.

Web Title: Sanjay Jadhav should keep his mouth shut - A - A