संघर्ष धान्य बँकेच्यावतीने ११ समाजसेवकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:46 IST2021-02-26T04:46:40+5:302021-02-26T04:46:40+5:30
राष्ट्रसंत गाडगे महाराज व सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संघर्ष धान्य बँकेचे शिवाजी झेंडेकर, ...

संघर्ष धान्य बँकेच्यावतीने ११ समाजसेवकांचा गौरव
राष्ट्रसंत गाडगे महाराज व सर्व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संघर्ष धान्य बँकेचे शिवाजी झेंडेकर, संजय पांढरे, धर्मराज करपे, सुभाष काळे, सुरेश भोपळे, बाळासाहेब गावडे, सुरेश नवले यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक बँकेचे संचालक शिवाजी झेंडेकर यांनी केले. बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अनेक समाजसेवक समाजसेवेची कामे अविरतपणे करीत आहेत. त्यांचे काम इतरांना दिशादर्शक आहे. परंतु ते सर्वांपर्यंत पोहोचले नाही. त्यासाठी अशा समाजरत्नांचा सन्मान करण्यात आल्याचे झेंडेकर म्हणाले.
गौतम खटोड यांनी संघर्ष धान्य बँकेच्या उपक्रमाची प्रशंसा करून या बँकेत पाच क्विंटल धान्य अविरतपणे देणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी पंढरीनाथ लगड, सपोनि संदीप काळे, प्रवीण काळम पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले. लॉकडाऊनच्या काळात संघर्ष धान्य बँकेने केलेली सामाजिक मदत कधीच विसरणार नाही असे, दत्ता बारगजे यावेळी म्हणाले. याप्रसंगी जे. डी शाह, रणजीत पवार, बाळासाहेब दहिफळे, डॉ. सचिन म्हेत्रे, जगन्नाथ घोडके, भारत साळुंके, सखाराम शिंदे, चंद्रकांत इंगोले, शालिनी इंगळे, प्रगती बचत गट, शिवसह्याद्री युवा प्रतिष्ठान अशा अकरा समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सहकुटुंब सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, समाजसेवी मंडळी उपस्थित होते. सूत्रसंचालन धर्मराज करपे यांनी केले. बाळासाहेब गावडे यांनी आभार मानले.
फोटो
गेवराई येथे राष्ट्रसंत गाडगे बाबा जयंतीनिमित्त धान्य बँकेच्या वतीने ११ समाजसेवींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्ती व उपस्थित नागरिक
===Photopath===
250221\dsc_4039_14.jpg~250221\dsc_3930_14.jpg