संदीपान भुमरे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:36 IST2021-02-09T04:36:58+5:302021-02-09T04:36:58+5:30

पथदिवे बंद बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे ...

Sandipan Bhumare felicitated | संदीपान भुमरे यांचा सत्कार

संदीपान भुमरे यांचा सत्कार

पथदिवे बंद

बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड होते. यामुळे भुरट्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. नगरपालिकेला याविषयी सांगूनही पथदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

रस्ता खड्ड्यांनी व्यापला

बीड : शहरातील आदर्शनगरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळणी झाली आहे. नाल्याचे पाणी रस्त्यावर येत असून, ते साचून राहत असल्याने खड्ड्यांचा आकार वाढत आहे. त्यामुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त आहेत. दुरुस्तीची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. तरीही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी होत आहे.

ठिकठिकाणी होतेय अवैध दारू विक्री

गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Web Title: Sandipan Bhumare felicitated