वाळू टिप्परने घेतला आणखी एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:54+5:302021-06-20T04:22:54+5:30
माजलगाव : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक युवक ठार तर एक जण गंभीर ...

वाळू टिप्परने घेतला आणखी एक बळी
माजलगाव : वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक युवक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या वाजण्याच्या सुमारास खामगाव - पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर लहामेवाडी फाट्याजवळ घडली.
माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथील रहिवासी तुकाराम खंडोबा गायके (२०) व बाबुराव बालासाहेब गायके (३२) हे काही कामानिमित्त नित्रुड या गावी गेले होते. काम उरकून रात्री नऊ वाजेनंतर दुचाकीवरून (क्र.एम. एच-१२,बीएल-४७९८) गावाकडे परतत होते. यावेळी पंढरपूर-खामगाव राष्ट्रीय महामार्गावर माजलगावकडून वाळू घेऊन टिप्पर येत होता. लहामेवाडी फाट्यावर टिप्परने जोराची धडक दिल्याने, झालेल्या अपघातात दुचाकीवरील तुकाराम खंडोबा गायके याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्यासोबत असणारा बाबुराव बालासाहेब गायके हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, जखमीवर बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अज्ञात वाळू टिप्परची पोलिसांकडून माहिती घेतली जात आहे. प्रकरणाचा तपास सपोनि नीलेश ईधाते करत आहेत.
===Photopath===
190621\purusttam karva_img-20210619-wa0018_14.jpg