शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये वाळू माफियांची दादागिरी; जेसीबी अंगावर घालून तहसीलदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 12:08 IST

महसूल पथकाने ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त; हल्ल्याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा

आष्टी (जि. बीड) : आष्टी तालुक्यात तहसीलदार वैशाली पाटील यांनी सीना नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांवर मोठी कारवाई केली आहे. मात्र, कारवाईनंतर महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना वाळू माफियांनी शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली आहे.

तहसीलदार वैशाली पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत सीना नदीपात्रात संगमेश्वर मंदिराजवळ, हिंगणी येथे अवैध गौण खनिज व वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ पथकासह छापा टाकला. या कारवाईत महसूल पथकाने एक पिवळ्या रंगाचा जेसीबी, नंबर नसलेले तीन ट्रॅक्टर, एक ट्रॉली आणि घटनास्थळी साठवलेली ३० ब्रास वाळू, असा एकूण ५१ लाख ३ हजार ४०० किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. पथकामध्ये तलाठी राजकुमार आचार्य (मातकुळी), प्रवीण शिंदे (चिखली), स्नेहल थेटे (खडकत), योगेश गोरे (धानोरा), मंडळ अधिकारी सुभाष गोरे, महसूल सहायक दिलीप गालफाडे आणि महसूल शिपाई कुंदन बावरे यांचा समावेश होता.

कर्मचाऱ्यांवर हल्लाजप्त केलेला मुद्देमाल तहसील कार्यालयाकडे घेऊन येत असताना, आष्टी शहरातील खडकत चौकात फॉरेस्ट ऑफिसजवळ तीन अनोळखी इसम क्रेटा (एमएच ४२ बीई ०७७६) गाडीतून आले आणि त्यांनी महसूल पथकाशी हुज्जत घालून कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. वाळू माफियांनी कर्मचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून घेतला आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर जेसीबी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शुभम करडुळे व इतरांनी आणखी काही वाहने आणून महसूल पथकाच्या ताब्यातून एक ट्रॅक्टरचे हेड/धुड जबरदस्तीने पळवून नेले. पथकातील तलाठी प्रवीण शिंदे आणि इतरांना चापटांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या गंभीर घटनेनंतर तलाठी सचिन विठ्ठल तेलंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आष्टी पोलिस ठाण्यात वाळू माफियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sand mafia attacks Tehsildar in Beed, attempts to kill her.

Web Summary : In Beed, sand mafia attacked a Tehsildar and her team during an illegal sand mining raid. They tried to run them over with a JCB and assaulted officials, stealing seized property. Police have registered a case.
टॅग्स :sandवाळूBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस