धारूर शहरात १९३ घरकुलांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:20+5:302021-04-10T04:33:20+5:30
धारूर नगर परीषदेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रत्येक कुंटूंबाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, ...

धारूर शहरात १९३ घरकुलांना मंजुरी
धारूर नगर परीषदेच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. प्रत्येक कुंटूंबाला हक्काचे घर मिळाले पाहिजे, हा या योजनेचा हेतू असून धारूर नगरपरीषद हद्दीत पहिल्या टप्प्यात ७४ घरकुल मंजूर होते. या पैकी बहूतांशी पुर्ण झाले असून काहीचे काम अंतीम टप्प्यात आहे. आता पुन्हा १९३ घरकुलांना मंजूरी मिळाली असून जे प्रस्ताव परिपूर्ण होते असे सर्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर त्रुटींअभावी राहिलेल्या प्रस्तावास लवकरच मंजूरी मिळण्यासाठी नगर परीषद प्रशासन प्रयत्न करत आहे.
राज्य शासना कडून मिळणारा निधी प्रत्येकी एक लाख रुपये नगरपरीषदेकडे उपलब्ध असून केंद्राकडून मिळणारा दिड लाख रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होईल. कामाच्या प्रगतीनुसार हा निधी टप्प्या टप्प्याने दिला जातो, असे नगर परीषदेतील या विभागाचे अभियंता विष्णू कराड यांनी सांगितले.
सर्व लाभार्थ्यांचा समावेश
धारूर शहरात पहिल्या टप्प्यातील ७४ घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून नव्याने मंजूर १९३ घरकुलांचे काम चांगल्या दर्जाचे व वेगाने पूर्ण कसे होईल यासाठी नगर परिषद प्रशासन काम करत आहे. शहरातील सर्व भागातील लाभार्थ्यांचा यात समावेश असल्याचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी सांगितले.
===Photopath===
090421\img-20210409-wa0125_14.jpg