शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही; बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावरून संभाजीराजे संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 20:28 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासात होत असलेल्या दिरंगाईवरून संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे.

Sambhajiraje Chhatrapati ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर आज स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी  देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या भेटीनंतर संभाजीराजेंनी सरकारला आक्रमक इशारा दिला आहे. "आत्येभावाने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तीन तास मजा पाहिली. आता एका पोलिसाला निलंबित केलं आहे आणि एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. एवढ्यावर आम्ही गप्प बसणार नाही. या पोलिसांनाही सहआरोपी करा. जो आरोपी सुदर्शन घुले फरार आहे, त्याला या जिल्ह्यातील माजी मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांचं पाठबळ असतं. तो घुले सहा दिवसांपासून फरार आहे, त्याला धनंजय मुंडेंनी सरेंडर व्हायला सांगितलं पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या पक्षाचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे हादेखील या प्रकरणात आरोपी आहे. या प्रकरणातील त्या वाल्मिक कराडला घेऊन धनंजय मुंडे हे मुख्यमंत्र्यांसहित इतर मंत्र्यांसोबत फोटो काढतात. आरोपींना अटक झाली नाही तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही," असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

संभाजीराजे पुढे म्हणाले की, "संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली आहे. ही घटना ऐकून मी गहिवरून गेलो आहे. बीड जिल्हा आता बिहारच्या मार्गावर चालला आहे का, असा प्रश्न पडतोय. एका सर्वसामान्य घरातील संतोष देशमुख यांची सरपंचपदाची ही तिसरी टर्म होती. हा प्रामाणिक माणूस वाद सोडवण्यासाठी पवनचक्की कार्यालयापाशी गेला होता. तिथं एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीला दमदाटी करण्यात आली होती. पण मध्यस्थी करणाऱ्या संतोष देशमुखची हत्या करण्यात आली."

दरम्यान, जोपर्यंत या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये, अशी विनंती संभाजीराजेंनी केली आहे. तसंच "माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, तुम्ही जातीने लक्ष घाला. पोलिसांसमोर या गोष्टी घडलेल्या आहेत. तरीही पोलिसांनी लवकर गुन्हा नोंद केलेला नाही. या प्रकरणात एसआयटीची स्थापना करा आणि त्यामध्ये स्थानिक पोलीस अधिकारी न देता बाहेरचे अधिकारी द्या," अशी मागणीही संभाजीराजेंकडून करण्यात आली आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीDhananjay Mundeधनंजय मुंडेAjit Pawarअजित पवार