शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीला सलाम! पोलीस स्टेशनसमोर चहाची टपरी चालविणाऱ्याच्या पत्नीची पोलीसदलात निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 20:03 IST

चहावाल्याची पत्नीने संसाराला हातभारासाठी शिकवणी घेतली पण जिद्द नाही सोडली

- मधुकर सिरसट केज : जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कठीण परिस्थितीवर सुद्धा मात करता येते याची प्रचीती केजमध्ये दिसून आली. रस्त्यावर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या बालाजी पाचपिंडे यांच्या पत्नी माधवी यांची पोलिसात एका नाही, तर दोन पदावर निवड झाली आहे. विशेष म्हणजे, संसाराला हातभार लावण्यासाठी माधवी यांनी शिकवणी घेतली, त्यातून वेळ मिळेल तशी तयारी करत त्यांनी हे यश प्राप्त केले.

केज येथील पोलीस ठाण्याच्यासमोर महामार्गालगत चहाची टपरी चालवून बालाजी पाचपिंडे हे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. ते लातूर जिल्ह्यातील तांदुळजा येथील मूळ रहिवाशी. उपजीविकेच्या शोधात त्यांनी तीन वर्षांपूर्वी केज या ठिकाणी छोट्याश्या एका टपरीत चहा विक्रीचा व्यवसाय सुरु केला. यातून त्यांना दिवसाकाठी 600 ते 1 हजार रुपये मिळतात. त्यातूनच त्यांना खोलीचा किराया आणि महिन्याचा कुटुंबाचा खर्च भगवावा लागतो.त्यांना राहायला स्वतःचे घर देखील नाही.

केज येथील महात्मा जोतिबा फुलेनगर मध्ये ते एका छोट्याशा खोलीत किरायाने राहतात. पत्नी माधवी पाचपिंडे-वाघचौरे या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन कुटुंबाला हातभार लावतात. हे करीत असतानाच माधवी यांनी पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली. पती बालाजी, नणंद जमादार रुक्मिणी पाचपिंडे यांनी प्रोत्साहन दिले. दरम्यान, माधवी यांची मुंबई पोलिस दलात पोलीस आणि चालक या दोन्ही पदावर निवड झाली. त्या लवकरच प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत. मनात आणले तर जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कठीण परिस्थितीमध्ये देखील यश खेचून आणता येते, हेच माधवी पाचपिंडे यांनी सिद्ध करून दाखविले आहे.

दोन पदावर निवड, पोलीस ठाण्यात सत्कार...केज पोलीस ठाण्यासमोर चहाची टपरी चालविणारे बालाजी पाचपिंडे आणि मुंबई पोलिसात पोलीस आणि चालक म्हणून निवड झालेली त्यांची पत्नी   माधवी या दांपत्याचा केज पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी आज पोलीस ठाण्यात दोघांचाही सत्कार केला. या वेळी पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, आनंद शिंदे, वैभव सारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम यादव, दिलीप गित्ते, संतोष गित्ते, राजू गुंजाळ,  बाळासाहेब अहंकारे, रुक्मिण पाचपिंडे, निरडे, सुर्वे, सतीश बनसोडे हे उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस