शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

धक्कादायक! बीडच्या कारागृहात सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याचा गांजा वाटपावरून राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:30 IST

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेसह चौघांविरोधात गुन्हा दाखल

बीड : येथील जिल्हा कारागृहात गांजा तस्करीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारागृहाच्या तटभिंतीवरून बाहेरून गांजा मागवून त्याच्या वाटण्यावरून चार कैद्यांमध्ये तुफान भांडण झाले. ही घटना निदर्शनास आल्यानंतर कारागृह अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करत धमक्या दिल्या. या प्रकरणी चार न्यायाधीन बंदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याचाही समावेश आहे.

९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ च्या सुमारास जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ मध्ये ठेवलेल्या चार कैद्यांमध्ये भांडणे सुरू झाल्याचे सुभेदार बलभीम किसनराव चिंचाणे यांना दिसून आले. त्यांनी तपासणी केली असता, न्यायाधीन बंदी श्याम उर्फ बाळू उत्तम पवार, वसीम खान अफजल खान पठाण, यमराज धरमसिंग राठोड आणि सतीश उर्फ खोक्या निराळ्या भोसले यांच्याकडे गांजासदृश अमली पदार्थ सापडला. या चारही कैद्यांनी संगनमत करून कारागृहाच्या तटभिंतीवरून बाहेरील व्यक्तीमार्फत हा गांजा मागवला होता. हा गांजा कागदात गुंडाळून पाण्याच्या बॉक्सखाली लपवून ठेवलेला होता. वाटण्यावरून त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. अधिकाऱ्यांनी जाब विचारला असता, कैद्यांनी त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि ‘बाहेर आल्यावर बघून घेतो’ अशी धमकी दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी नायब तहसीलदारांसमक्ष पंचनामा करून ४६ ग्रॅम वजनाचा, ६०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी, चारही आरोपींवर गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांन्वये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला आहे.

चारही आरोपींना दुसरीकडे हलवणारखोक्या भोसलेसह हे चारही आरोपी कुख्यात गुन्हेगार आहेत. दरोडा, खुनासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यांच्यात गांजा वाटपावरून वाद झाला. शिवाय अधिकाऱ्यांनाही धमकी दिली. यात गुन्हा दाखल झाला असला तरी या सर्वांना बीडमधून लातूर किंवा छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात हलविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तपास केला जाईलया प्रकरणात १० ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल झाला असून ११ ऑगस्ट रोजी त्याची कागदपत्रे माझ्याकडे आली आहेत. यात आता जबाब घेण्यासह इतर तपास केला जाईल.- गजानन क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक बीड

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीSuresh Dhasसुरेश धसBeed Crimeबीड क्राईम मराठी बातम्या