१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडेकडे सापडले घबाड

By सोमनाथ खताळ | Published: May 16, 2024 10:09 PM2024-05-16T22:09:15+5:302024-05-16T22:09:55+5:30

याच लाच प्रकरणात निलंबित सहायक फौजदारच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे.

Rs 1 crore cash, 5.5 kg gold and silver found in the house of absconding police inspector Haribhau Khade in bribery case | १ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडेकडे सापडले घबाड

१ कोटींची रोकड, किलोभर सोने; निलंबित पीआय हरिभाऊ खाडेकडे सापडले घबाड

बीड : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकासह सहायक फौजदार आणि खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत.

बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता खाडे यांच्या बीड मधील किरायच्य घरात रोख एक कोटी आठ लाख रुपये, १० तोले सोने, साडे पाच किलो चांदी आणि सहा ठिकाणच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे सापडले आहेत. पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली.

हरिभाऊ खाडे पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी १ कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.

जाधवरच्या घरात २५ तोळे सोने
सहायक फौजदार जाधवर यांच्या घरात तब्बल २५ तोळे सोने सापडले आहे. तसेच रोख १८ हजार एवढी रक्कम मिळाली आहे. ती सर्व जप्त केली आहे.

Web Title: Rs 1 crore cash, 5.5 kg gold and silver found in the house of absconding police inspector Haribhau Khade in bribery case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.