धारूर शहरातील एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 17:30 IST2018-11-02T17:29:26+5:302018-11-02T17:30:51+5:30
गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

धारूर शहरातील एसबीआय बँकेत चोरीचा प्रयत्न फसला
धारूर (बीड) : शहरातील तेलगाव रोडवरील भारतीय स्टेट बँकेच्या मागील गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याबाबत बँक शाखाधीकारी यांनी धारूर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी काम संपल्यानंतर येथील एसबीआय बँकेस कुलूप लावण्यात आले. यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी शाखेच्या मागील बाजूस असलेल्या गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गेटचा आतील लाकडी दरवाजा सुद्धा त्यांनी तोडला होता, मात्र त्याच्या आता लोखंडी शटर असल्याने चोरट्यांना आत प्रवेश करता आला नाही.
हा सर्व प्रकार आज सकाळी बँक उघडताना लक्षात आला. याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी मिंलीद रोठे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय सुतनासे हे करत आहेत.