शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

दरोडा, चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 11:25 PM

स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई उल्लेखनीय आहे. गुन्हे उघडकीस आणणे हाच अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देहर्ष पोद्दार यांची माहिती : बीड शहर व परिसरात घडले होते गुन्हे, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

बीड : मागील काही काही दिवसांपासून बीड शहरात झालेल्या ४ घरफोड्या व एक सशस्त्र दरोड्यातील आरोपी मुद्देमालासह अटक केले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई उल्लेखनीय आहे. गुन्हे उघडकीस आणणे हाच अशा घटनांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे, अशी प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तसेच पुढील काळात राबवण्यात येणाऱ्या इतर कार्यक्रमाविषयी माहिती दिली.यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पो.नि. भारत राऊत यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पोद्दार म्हणाले, शिवाजीनगर ठाणे हद्दीत ३ आणि बीड शहर ठाणे हद्दीत १ अशा चार घरफोड्या बीड शहरात झाल्या होत्या. तसेच बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत गोरे वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकला होता. या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेची ३ पथके तपास करत होती. यावेळी मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून घरफोडी करणारा हरजीतसिंग टाक (रा. सोलापूर ह.मु लातूर) त्याचा मेहुणा बिजेंदरसिंग मनवसिंग गोके (रा.वडवणी) यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक केली होती. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी चोºया केल्याची कबुली दिली. यामध्ये बीड शहर हद्दीत झमझम कॉलनी, शिवाजीनगर हद्दीत गयानगर जालना रोड, जवाहर कॉलनी, याज्ञवल्क्यनगर, याठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले. या सर्व गुन्ह्यात मिळून ३ लाख ७६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व नगद रक्कम चोरी गेली होती. याची कसून चौकशी केली असता, आरोपी विजेंदरसिंग मनवरसिंग गोके याने राहत्या घरी वडवणी येथे दागिने ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार २ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. दोन आरोपींना न्यायलयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अन्य साथीदार व गुन्हे उघड करण्यासंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.दुसरी घटना बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत शहराजवळीत गोरे वस्तीवर घडली. मीनाबाई लोभाजी जगताप यांच्या घरी १०-१२ जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. रोकड, मोबाईल असा ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. तसेच घरातील व्यक्तींना जखमी केले होते. ही घटना ११ नोव्हेंबर रोजी घडली होती. यातील १ आरोपी स्था.नि. गुन्हे शाखेने अटक केला आहे. हे आरोपी उस्मानाबाद जिल्ह््यातील होते. यातील आरोपी हा ईटकूर येथे दारू पिण्यासाठी येत आहे. अशी गुप्त माहिती पो. नि. राऊत यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. शिवाजी उर्फ मकल्या नामदेव काळे (रा. टोकणीपेढी, ईटकूर ता. कळंब ) याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यानंतर कसून चौकशी केल्यानंतर गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या इतर साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. या घटना उघडकीस आल्यामुळे चोरी आणि दरोड्याच्या इतर घटना देखील उघडकीस येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि. भारत राऊत, सपोनि बाळासाहेब आघाव, पोउपनि संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप, जयसिंग वाघ, शेख सलीम, बालाजी दराडे, शेख नसीर, भास्कर केंद्रे, साजिद पठाण, रामदास तांदळे, कैलास ठोंबरे, सखाराम पवार, प्रसाद कदम, सती, कातखडे, शेख आसेफ, नारायण कोरडे, गोविंद काळे, चालक संजय जायभाय, मुकुंद सुस्कर, संतोष हारके यांनी केली.

टॅग्स :BeedबीडBeed S Pपोलीस अधीक्षक, बीडRobberyचोरी