रत्नेश्वर मंदिराचा रस्ता उजळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:57+5:302021-01-13T05:27:57+5:30
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रहिवासी सुरेखा किशनराव डांगे यांनी पाथरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामपुरी रत्नेश्वर येथील गोदावरी ...

रत्नेश्वर मंदिराचा रस्ता उजळला
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील रहिवासी सुरेखा किशनराव डांगे यांनी पाथरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र रामपुरी रत्नेश्वर येथील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या पुरातन काळातील श्री रत्नेश्वर मंदिराला शुक्रवारी २२ पथदिवे अर्पण केले. यामुळे मंदिर परिसरात आणि मंदिर ते गावापर्यंतचा रस्ता प्रकाशमय झाला. माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील डांगे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. रामपुरीपासून काही अंतरावर श्रीरत्नेश्वराचे पुरातन मंदिर आहे. या मंदिरात रत्नेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी माजलगाव व पाथरी तालुक्यातील भाविकांची नेहमीच वर्दळ असते. रात्रीच्या वेळी भाविकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. हा अंधार दूर करण्यासाठी सुरेखा डांगे यांनी २२ पथदिवे बसवून सुविधा केली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन रामपुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी माणिकराव गोरे, महेश कुलकर्णी, अवधूत कुलकर्णी, केशव उंबरे, बंडोपंत उंबरे, शमशोद्दीन, अशोक कावारे, पवन कावारे आदींनी परिश्रम घेतले.