रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:26 IST2021-01-13T05:26:28+5:302021-01-13T05:26:28+5:30
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगार निर्मिती उपलब्ध होणार ...

रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगार निर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गाव रस्ते, शिवरस्ते यांची कामे सुरू केली तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्धतेची मागणी होत आहे.
कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
अंबाजोगाई : आधार लिंकिंग व तांत्रिक कारणांमुळे तालुक्यात अद्यापही शेतकरी महात्मा जोतीबा फुले कर्जमुक्ती योजनेपासून वंचित आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे या शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग होत नसल्याने शेतकरी वंचित आहेत.
बसेसची मागणी
बीड : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अनेक महिने बसेस बंद होत्या. आता त्या पुन्हा सुरू झाल्या आहेत; परंतु आजही अनेक गावांमध्ये बसेस धावत नाहीत. प्रवासी मिळत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळाकडून सांगितले जात असले तरी सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.