रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:31 IST2021-02-14T04:31:21+5:302021-02-14T04:31:21+5:30
शेतीला पाणी मिळेना बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला ...

रस्त्याची दुरवस्था
शेतीला पाणी मिळेना
बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.
वीज दिवसा द्या
शिरूर कासार : रब्बी हंगामातील पिकांना पूर्ण दाबाने दिवसाच वीजपुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बिबट्याची भीती अजून गेलेली नाही. महावितरणने दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने, सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
‘जैविक’चा धोका
अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.