जैविक कचऱ्याचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:28 IST2021-01-15T04:28:21+5:302021-01-15T04:28:21+5:30

अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष ...

Risk of organic waste | जैविक कचऱ्याचा धोका

जैविक कचऱ्याचा धोका

अंबाजोगाई : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

सुविधा द्याव्यात

नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.

इंटरनेट सेवा विस्कळीत

बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.

बस सुरू करा

अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अ‍ॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.

रस्ता दुरुस्त करा

बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटे वस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

Web Title: Risk of organic waste