शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
4
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
5
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
6
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
7
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
8
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
9
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
10
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
11
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
12
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
13
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
14
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
15
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
16
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
17
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
18
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
19
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
20
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
Daily Top 2Weekly Top 5

कोविडसंदर्भात प्रकाश सोळंकेंनी घेतली आढावा बैठक; अधिकारी, कर्मचाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:25 IST

माजलगाव : मतदारसंघातील कोविड परिस्थितीसंदर्भात व येणाऱ्या संभाव्य कोविड लाटेबाबत आणि स्वस्त धान्यवाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करा, अशा स्पष्ट ...

माजलगाव : मतदारसंघातील कोविड परिस्थितीसंदर्भात व येणाऱ्या संभाव्य कोविड लाटेबाबत आणि स्वस्त धान्यवाटपातील गैरव्यवहार रोखण्यासाठी उपाययोजना करा, अशा स्पष्ट सूचना आढावा बैठकीत आ. प्रकाश सोळंके यांनी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. कोरोनाबाबतही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर करू नये, याबाबतही संबंधितांना आमदार सोळंके यांनी धारेवर धरले.

येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात गुरुवार रोजी झालेल्या आढावा बैठकीला आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह बीड जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंग सोळंके, समाजकल्याण सभापती कल्याण आबूज, पंचायत समिती सभापती भागवतराव खुळे, पंचायत समिती सदस्य शशांक सोळंके, जयदत्त नरवडे, नगरसेवक भागवतराव भोसले, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश साबळे, तालुका अधिकारी डाॅ. मधुकर घुबडे, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने आणि कर्मचारी, आदी उपस्थित होते.

आमदार सोळंके म्हणाले, कोरोनाकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या हितासाठी प्रयत्न करावेत. शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धती आणि सेवा याचे कौतुक करतानाच खासगी रुग्णालयांनी कोविडबाबत दर्जेदार सेवा पुरविण्याची गरज आहे. काही खासगी रुग्णालये भरमसाट बिले आकारत असल्याचेही निदर्शनास आल्याचे सोळंके म्हणाले. खाजगी रुग्णालयातील बिलांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले. संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेंतर्गत मिळणारे मानधन वेळेवर लाभार्थ्यांना मिळत नाही. काही ठिकाणी बँकेत रक्कम वर्ग झाल्यानंतर बँक कर्मचारी उदासीनपणा दाखवून अडथळा आणत आहेत, याबाबतही संबंधितांना धारेवर धरत या योजनेमध्ये सुसूत्रता आणण्याची गरज असल्याचे सोळंके म्हणाले.

===Photopath===

270521\2302purusttam karva_img-20210527-wa0057_14.jpg