चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने चिमुकल्या पुतणीला बुडवून मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 05:18 IST2017-10-25T05:18:29+5:302017-10-25T05:18:31+5:30

धारुर (जि. बीड) : चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने अवघ्या दीड वर्षाच्या पुतणीस पाण्याच्या टाकीत बुडवून मारले, तर भावजयीस विहिरीत ढकलून दिले.

For the revenge of the cousin, the maiden dumped a pinch of a stick | चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने चिमुकल्या पुतणीला बुडवून मारले

चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने चिमुकल्या पुतणीला बुडवून मारले

धारुर (जि. बीड) : चुलत भावाशी झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी चुलत्याने अवघ्या दीड वर्षाच्या पुतणीस पाण्याच्या टाकीत बुडवून मारले, तर भावजयीस विहिरीत ढकलून दिले. भावजय पोहून वर आली असता तिच्या गळ्यावर पाय ठेवून तिला विष पाजल्याचा क्रूर प्रकार तालुक्यातील असोला येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रवीण राजाभाऊ चोले याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
राहीबाई वसंत चोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी त्यांचा मुलगा धनराज आणि पुतण्या प्रवीण यांच्यात दारू पिण्यावरून भांडण झाले. सोमवारी दुपारी १ वाजता राहीबाई शेतात सोयाबीन काढण्यासाठी गेल्या. दुपारी ३ वाजता सोनाली तिची दीड वर्षाची मुलगी जनाला घेऊन शेताकडे निघाली असता आरोपी प्रवीण याने तिला अडविले. जनाला हिसकावून घेत शेतातील पाण्याच्या टाकीमध्ये बुडवून मारले आणि बांधावर टाकून दिले. त्यानंतर सोनालीला विहिरीत ढकलले. मात्र, ती पोहून वर आली असता प्रवीणने तिच्या गळ्यावर पाय देऊन तिला विष पाजले आणि पळून गेला.
सायंकाळी राहीबार्इंना कोळपिंपरी शिवारातील एका बांधावर सोनाली पडलेली आढळली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: For the revenge of the cousin, the maiden dumped a pinch of a stick