शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कामावरून घरी परतताना सहकाऱ्याकडूनच महिला पोलीस कर्मचा-याचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 01:02 IST

मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मी तुझ्यावर प्रेम करतो, असे म्हणत ड्यूटी संपवून घरी परतत असताना रस्त्यात अडवून आपल्या सहकारी महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची घटना बीडमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोलीस नाईकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडिता व आरोपी हे आठ महिन्यांपूर्वी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत होते, असे समजते.शेख शौकत शेख मुन्सी (३३) असे आरोपी पोलीस नाईकचे नाव असून तो मोटार परिवहन विभागात कार्यरत आहे.शौकत व पीडिता हे बीड शहरातीलच एका पोलीस ठाण्यात यापूर्वी कार्यरत होते. साधारण आॅक्टोबर महिन्यात शौकतने पीडितेचा मोबाईल घेऊन त्यातील तिचे सर्व फोटो स्वत:च्या मोबाईलमध्ये घेतले. त्यानंतर तिला तो ब्लॅकमेल करू लागला.सोशल मीडियावरून जवळीक साधू लागला. हा त्रास वाढल्याने पीडितेने आपल्या पोलीस पतीला सांगितला. त्यानंतर शौकतविरोधात तक्रार दिली. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि शिवलाल पुर्भे यांनी यात शौकतचा जबाब घेऊन कारवाई केली. त्यानंतर आपण तिला त्रास देणार नसल्याचे लेखी दिले. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी शौकतची बदली अंभोरा पोलीस ठाण्यात केली.दरम्यान, तरीही त्याने पीडितेचा पाठलाग करणे सोडले नाही. १६ मे रोजी रात्री ८ वाजता ड्यूटी संपवून पीडिता दुचाकीवरून घरी जात होती. याचवेळी जिल्हा रूग्णालयाच्या पाठीमागील संगम हॉलजवळ शौकतने पीडितेची दुचाकी अडविली. तिला दुचाकीवरून खाली ओढत ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत विनयभंग केला. पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि आरडाओरडा केला. तोपर्यंत शौकतने तेथून पळ काढला.हे प्रकरण ठाण्यात जाण्यापूर्वी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे ही तक्रार केली. त्यांनी विशाखा समितीपुढे हे प्रकरण मांडले. चौकशी करून २५ मे रोजी सायंकाळी शहर ठाण्यात शौकतविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.शहर पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्नशनिवारी सायंकाळच्या सुमारास हा गुन्हा दाखल झाला. माध्यमांनी याबाबत शहर पोलिसांशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तसेच रविवारीही पीएसओंनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या सर्व प्रकारावरून शहर पोलीस आरोपीला पाठिशी घालत असल्याचे दिसून येते. रविवारी उशिरापर्यंत आरोपीला पोलिसांनी अटक केलेली नव्हती. त्यामुळे शहर पोलीस संशयाच्या भोव-यात अडकले आहेत.आरोपी पोलीस तीन लेकरांचा बापशेख शौकत याची पत्नी शिक्षिका असल्याचे सांगण्यात आले. त्याला तीन अपत्ये आहेत.पीडितेचा पतीही पोलीस असून तो सुद्धा बीडमधीलच एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगCrime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीस