शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

चोरीच्या गुन्ह्यातील अडीच लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:16 AM

चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.

ठळक मुद्देसन्मानपूर्वक वाटप : सोने, चांदीचे दागिने, मोटार सायकली, शालेय कागदपत्रांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चोरीच्या गुन्ह्यात तपास करून पोलिसांनी हस्तगत केलेला ३ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल शनिवारी ११ फिर्यादी तसेच मुळ मालकांना सार्वजनिक कार्यक्रमात सनमानपूर्वक सुपुर्द करण्यात आला. येथील पोलीस उपअधीक्षक कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.एक जबरी चोरी, एक घरफोडी आणि चोरीचे चार अशा सहा गुन्ह्यातील सोने, चांदीचे दागिने, नगदी रक्कम, शालेय कागदपत्रे तसेच परळी शहर, माजलगाव शहर आणि दिंद्रुड पोलीस ठाणेअंतर्गत दाखल पाच अशा ११ गुन्ह्यातील एकुण २ लाख ३४ हजार रूपयांचा मौल्यवान मुद्देमाल या सार्वजनिक कार्यक्रमात फिर्यादी, मूळ मालकांना पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आला. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची संकल्पना व मार्गदर्शनातून तसेच सततच्या पाठपुराव्यामुळे हा कार्यक्रम होत असल्याचे उपअधीक्षक (गृह) भास्कर सावंत यांनी सांगितले. या कार्यक्रमास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, मोहरील रामदासी, जाधव, येवले, यादव यांच्यासह फिर्यादी संतोष पांचाळ, नितीन घोडके, विजय सुरवसे, कांताराव सुरवसे, नदीम कुरेशी, प्रमोद डोंगरे आदी उपस्थित होते.गुन्हा घडल्यापासून ते गुन्ह्यातील सोन्याचे दागिने परत मिळेपर्यंत पोलिसांकडून सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्याचे फिर्यादी नितीन घोडके रा. गेवराई यांनी सांगितले.पाटोदा येथील माजी सैनिक काताराव सुरवसे यांनी शिवशही बसमधून प्रवासादरम्यान मुलगा विजय याच्या ताब्यातील शैक्षणिक कागदपत्रांसह फिससाठीची रक्कम असलेली बॅग चोरट्यांनी लंबास केली होती.ही माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, पोलीस निरीक्षक माने व स्टाफने जलदगतीने मोहीम राबविल्याने लष्करातील सर्जिकल स्ट्राइकची आठवण झाल्याचे सांगितले. मुलाच्या श्ैक्षणिक कागदपत्रांसह १५ हजार रुपये जशास तसे परत हस्तगत करून पोलिसांनी सन्मानपूर्वक दिल्याचे सांगून उपअधीक्षक भास्कर सावंत यांचा माजी सैनिक संघयनेच्या वतीने सत्कार केला.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीस