लॉकडाऊनचा परिणाम, कंपनीने कमी केले, युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST2021-05-27T04:35:00+5:302021-05-27T04:35:00+5:30
अजय बन्सी सलगर असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. अजय सलगर हा गेल्या सहा महिन्यापूर्वी खासगी कंपनीत कामासाठी ...

लॉकडाऊनचा परिणाम, कंपनीने कमी केले, युवकाची आत्महत्या
अजय बन्सी सलगर असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. अजय सलगर हा गेल्या सहा महिन्यापूर्वी खासगी कंपनीत कामासाठी पुणे येथे गेला होता. लॉकडाऊनमुळे कंपनीने त्याला कामावरून कमी केल्याने पाच दिवसांपूर्वी तो गावाकडे आला होता. मंगळवारी सकाळी अजय सलगर याने स्वतःच्या शेतात असलेल्या विहिरीत उडी मारली आणि पाण्यात बुडून मृत्यू पावला. अशी खबर चुलत भाऊ भानुदास सलगर यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली. बुधवारी परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे, पोलीस नाईक चंद्रकांत आंबाड यांनी वाघाळा येथे सलगर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व जवाब नोंदविला. अजयच्या पश्चात आई ,वडील एक लहान भाऊ असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता मुलगा गेल्याने सलगर कुटुंबास जबर धक्का बसला आहे...