निर्बंध शिथिल करून व्यावसायिकांना वेळ वाढवून द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST2021-08-12T04:37:57+5:302021-08-12T04:37:57+5:30

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध शिथिल करून छोट्या व मध्यम व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यास वेळ ...

Restrictions should be relaxed and professionals should be given more time | निर्बंध शिथिल करून व्यावसायिकांना वेळ वाढवून द्यावा

निर्बंध शिथिल करून व्यावसायिकांना वेळ वाढवून द्यावा

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील कोविडच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले निर्बंध शिथिल करून छोट्या व मध्यम व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यास वेळ वाढवून द्यावा, तसेच शनिवार आणि रविवारचा वीकेन्ड लॉकडाऊन रद्द करावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर व परिसरात कोविडचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. सद्यस्थितीत अंबाजोगाई तालुक्यात संक्रमित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढही नियंत्रणात आली आहे. त्यामुळे प्रादुर्भाव प्रतिबंधक उपाययोजनेमध्ये सध्या छोट्या व मध्यम व्यावसायिकांची दुकाने केवळ सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. या निर्णयामुळे छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच शनिवार व रविवार या दोन दिवसात वीकेन्ड लॉकडाऊन केले जात असल्याने प्रत्येक सोमवारी बाजारपेठेवर ताण येऊन मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे वीकेन्ड लॉकडाऊन तात्काळ रद्द करावा. दुकाने सुरू ठेवण्यास वेळ कमी असल्याने व्यापाऱ्यांत प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची भावना दिसून येत आहे. अर्थकारण कोलमडले आहे. यामुळे लोकभावनेचा कधीही उद्रेक होऊ शकतो, हे आपण लक्षात घेऊन नियमावलीमध्ये बदल करून व निर्बंध शिथिल करून छोट्या व मध्यम व्यावसायिकांना दुकाने सुरू ठेवण्यास जादा वेळ वाढवून द्यावा. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेपर्यंत अंबाजोगाई शहर व परिसरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, नगरसेवक महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, नगरसेवक वाजेद खतीब, नगरसेवक धम्मपाल सरवदे, राणा चव्हाण, दिनेश घोडके, शेख मुख्तार, अकबर पठाण, सचिन जाधव, महेबूब गवळी, शाकेर काझी, रफीक गवळी, जुनेद सिद्दीकी, प्रताप देवकर, अमोल मिसाळ, महेश वेदपाठक यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

090821\1354img-20210809-wa0073.jpg

अंबाजोगाई येथे निवेदन देण्यात आले

Web Title: Restrictions should be relaxed and professionals should be given more time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.