गुरुदेव विद्यालयामध्ये नारी शक्तिचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:16+5:302021-03-10T04:33:16+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय, मोरेवाडी या शाळेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा ...

गुरुदेव विद्यालयामध्ये नारी शक्तिचा सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त बनेश्वर शिक्षण संस्था, बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय, मोरेवाडी या शाळेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा, सचिव मेघना मोहिते पाटील, अष्टभुजा महिला मंडळाच्या आरती सोनेसांगवीकर, बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी गुरुदेव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शशिकला काकडे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ. नरेंद्र काळे म्हणाले की, पुरुषांचे कर्तृत्व आणि अस्तित्व हे केवळ आणि केवळ महिलांमुळेच आहे. महिलांच्या पाठबळाशिवाय कोणताही पुरुष आपले कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही.
याप्रसंगी अंजली चरखा, मेघना मोहिते पाटील व आरती सोनेसांगवीकर यांनीही आपले विचार प्रकट केले. आरती यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महिलांचे महत्व पटवून दिले.
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या महिलांचा गुरुदेव परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते गुरुदेव विद्यालयातील मुख्याध्यापिका शशिकला काकडे, विषयतज्ज्ञ शिक्षिका शीतल काळदाते, संगीता मोरे, सोनाली कोनाळे, शुभांगी सरवदे यांचा सन्मान करण्यात आला.
===Photopath===
090321\09bed_17_09032021_14.jpg
===Caption===
जागतिक महिला दिनानिमित्त बनेश्वर शिक्षण संस्था बनसारोळा संचलित गुरुदेव विद्यालय मोरेवाडी या शाळेमध्ये विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.