वृक्षलागवडीतून आपेगावात ऑक्सिजन पार्कचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:30+5:302021-07-02T04:23:30+5:30
आपेगाव : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे अटल घनवन योजनेंतर्गत तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांसोबत जिल्हा ...

वृक्षलागवडीतून आपेगावात ऑक्सिजन पार्कचा संकल्प
आपेगाव : अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे अटल घनवन योजनेंतर्गत तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी ग्रामस्थांसोबत जिल्हा परिषदेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी श्रमदान केले.
गावातील शासकीय जमिनीवर ग्रामस्थांच्या सहकार्यातून चिंच, लिंब, सीताफळ, वड, आंबा, अशोक, पिंपळ आदी तीन हजार झाडे लावण्यात आली. दहा गुंठे कार्याक्षेत्रात आरखडा करून सर्व झाडांची लागवड करण्यात आली. भविष्यात ऑक्सिजन पार्क करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षतोड होणार नाही यांची काळजी घेतली जात आहे. यासाठी तरुणांनी सहभागी होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जपण्याचा संकल्प करण्याचे आवाहन सरपंच प्रियांका नीलेश शिंदे यांनी केले. यावेळी गावकरी कोरोनाचे नियम पाळून सहभागी झाले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व गावातील तरुणांनी परिश्रम घेऊन वृक्षलागवड केली.