पोलिसांच्या नेमप्लेटचा बीड पॅटर्न राज्यभर;मंत्री संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र
By सोमनाथ खताळ | Updated: March 14, 2025 09:16 IST2025-03-14T09:16:03+5:302025-03-14T09:16:03+5:30
आगामी काळात 'बीड पॅटर्न' राज्यभरात लागू होऊ शकतो

पोलिसांच्या नेमप्लेटचा बीड पॅटर्न राज्यभर;मंत्री संजय शिरसाट मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र
सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यातील जातीयवाद संपविण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिसांच्या नेम प्लेटवरून आडनाव वगळण्याचा निर्णय घेतला होता. याचे स्वागत करत राज्याचे सामजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहोत, तसेच याची राज्यभर अंमलबजावणी करावी, अशी विनंती करणार असल्याचे सांगितले. जर शासनाने यावर निर्णय घेतला, तर आगामी काळात 'बीड पॅटर्न' राज्यभरात लागू होऊ शकतो.
९ डिसेंबर २०२४ रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि पोलिस अधीक्षक बदलले. २१ डिसेंबर २०२४ रोजी नवनीत काँवत यांची बीडला नियुक्ती झाली. त्यांनी आगोदर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने बोलण्यासंदर्भात २२ जानेवारी २०२५ रोजी आदेश काढून आवाहन केले. याला यश मिळाल्यानंतर त्यांनी प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याच्या टेबलवर केवळ पहिल्या नावाची नेम प्लेट देण्याचा निर्णय घेतला आहे
काय म्हणाले, संजय शिरसाट
भ्रष्टाचार आणि जातीयवाद वेगवेगळे विषय आहेत. हा जातीयवाद थांबविण्यासाठी आपण सरकारला विनंती करणार आहोत. जर असे केले, तर जातीयता कमी होईल, असा विश्वास आहे.
पोलिसांच्या मनातून 'जात' काढली?
राजकीय नेत्यांनी पोलिसांवर जातीचे आरोप केल्यानंतरच पोलिस अधीक्षक काँवत यांनी हा निर्णय घेतला. सामान्यांच्या मनाऐवजी अगोदर आपल्याच खात्यातील लोकांच्या मनातून 'जात' काढण्याचा प्रयत्न आहे. हळूहळू सामान्य लोकही याप्रमाणे बोलतील, असे काँवत म्हणाले. पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढल्यानंतर आता छातीवरील नेम प्लेटवरून आडनाव वगळले. पोलिसांना कोणतीही जात नसते. सामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही तत्पर असतो - नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बी