महामार्गावरील बार, दारू दुकान हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:15 IST2018-10-21T00:14:48+5:302018-10-21T00:15:45+5:30
राष्ट्रीय महामार्ग धुळे - सोलापूर महामार्गावरील निपाणी जवळका फाट्यावर असलेले बियर बार तसेच देशी दारूचे दुकान त्वरीत हटवावे या मागणीसाठी निपाणी जवळका व परिसरातील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले.

महामार्गावरील बार, दारू दुकान हटवा
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : राष्ट्रीय महामार्ग धुळे - सोलापूर महामार्गावरील निपाणी जवळका फाट्यावर असलेले बियर बार तसेच देशी दारूचे दुकान त्वरीत हटवावे या मागणीसाठी निपाणी जवळका व परिसरातील ग्रामस्थांनी शनिवारी सकाळी तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले.
निपाणी जवळका गावात गत काही महिन्यांपासून दारुबंदी केलेली आहे. असे असताना येथील फाट्यावर बियर बार व देशी दारूचे दुकान सुरू झाले. त्यामुळे गावातील तरुण व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले आहे. दुकानाजवळील गढी, निपाणी जवळका, रांजणी या गावातील महिला व मुलांना यांचा त्रास सहन करावा लागत आहे. हे दुकान त्वरीत हटवावे या मागणीसाठी गावातील गजानन लोणकर, लखन काकडे, सुनील लोणकर, सचिन धुमाळ, जगन काकडे, लहु लोणकर, अश्विनी काकडे, विद्या काकडे, सविता काकडे सह अनेक ग्रामस्थांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना निवेदन देत त्वरीत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.