शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना मोठा दिलासा; लोकायुक्तांकडून 'क्लीन चीट', अंजली दमानियांचे सर्व आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 16:02 IST

Dhananjay Munde Lokayukta: नॅनो खते ते स्प्रे पंप खरेदी; काय होतं 'ऑफिस ऑफ प्रॉफिट' प्रकरण? ज्यात मुंडेंना मिळाली क्लिन चीट

परळी: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना राज्य लोकायुक्तांकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृषी साहित्य खरेदी आणि ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ संदर्भात केलेले सर्व आरोप लोकायुक्तांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. उच्च न्यायालयानंतर आता लोकायुक्तांनीही क्लीन चीट दिल्याने मुंडे यांच्यावरील आरोपांची मालिका संपुष्टात आली आहे.

काय होते आरोप?मुंडे कृषिमंत्री असताना नॅनो खते, कापूस बॅग आणि बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप खरेदीत अनियमितता झाल्याचा आरोप दमानिया यांनी केला होता. शेकडो कोटींचा अपहार झाल्याचा दावा करत त्यांनी लोकायुक्तांकडे धाव घेतली होती. मात्र, लोकायुक्तांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात कोणतेही ठोस तथ्य किंवा पुरावा सादर करण्यात आलेला नाही. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही या याचिका फेटाळून लावत याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला होता.

'ऑफिस ऑफ प्रॉफिट'चा मुद्दा निकालीदमानिया यांनी मुंडे यांच्यावर ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ (लाभदायक पद) संदर्भातही आरोप केले होते. सुनावणी दरम्यान मुंडे यांचे वकील शार्दुल सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले दिले. संविधानातील कलमे आणि लोकप्रतिनिधित्व कायद्याचा अभ्यास केल्यानंतर लोकायुक्तांनी हा आरोप देखील फेटाळून लावला.

न्यायालयीन लढाईत मुंडेंचे वर्चस्वया निकालामुळे धनंजय मुंडे यांना मोठा राजकीय आधार मिळाला आहे. यापूर्वी पीकविमा संदर्भात कोणताही घोटाळा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले होते, तर निवडणूक शपथपत्रातील आरोपांतूनही मुंडे यांची सुटका झाली होती. आता लोकायुक्तांच्या निर्णयामुळे विरोधकांच्या आरोपांमधील हवा निघून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Dhananjay Munde gets clean chit from Lokayukta; Damania's allegations dismissed.

Web Summary : Dhananjay Munde received a major relief as the Lokayukta dismissed all allegations by Anjali Damania regarding agricultural purchases and 'Office of Profit'. The Lokayukta found no solid evidence of irregularities, echoing a previous High Court ruling. This decision strengthens Munde's political standing, clearing him of accusations related to corruption and misconduct.
टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेanjali damaniaअंजली दमानियाBeedबीड