‘जायकवाडीतून पाणी सोडा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:18 IST2019-04-24T00:14:57+5:302019-04-24T00:18:13+5:30
जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या माजलगाव धरणात ८४ एम.एम.क्यू. म्हणजेच २.९६ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे.

‘जायकवाडीतून पाणी सोडा’
बीड : जिल्ह्यात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. शहराला माजलगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. सध्या माजलगाव धरणात ८४ एम.एम.क्यू. म्हणजेच २.९६ टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक आहे. यातून दररोज १२ एम.एम. म्हणजेच २२३ एम.एम.क्यू. पाण्याचे बाष्पीभवन होते. माजलगाव व बीड शहराची लोकसंख्या व लागणारे पाणी पाहता जायकवाडी प्रकल्पातून पैठण येथील उजव्या कालव्यातून २ टी.एम.सी. पाणी सोडल्यास माजलगाव धरणात १ टी.एम.सी. पाणी पोहचेल व या दोन शहरांना पाऊस पडेपर्यंत पाणी पुरेल. त्यामुळे तातडीने जायकवाडी प्रकल्पातून २ टी.एम.सी. पाणी सोडण्याचे आदेश संबंधीत विभागाला देण्याची मागणी आ. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.