रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती रोज प्रसिद्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:37+5:302021-04-10T04:33:37+5:30
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बीड जिल्हा सामान्य रुग्णालय व शहरातील कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांवर उपचार ...

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती रोज प्रसिद्ध करा
शहरातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बीड जिल्हा सामान्य रुग्णालय व शहरातील कोरोनाबाधित किंवा संशयित रुग्णांवर उपचार करणारी खाजगी रुग्णालये पूर्णपणे रुग्णांनी भरलेली आहेत. आजच्या स्थितीत रुग्णांसाठी कोठेही लवकर खाटा उपलब्ध होत नाहीत. रुग्णांची संख्या वाढल्यामुळे आपसूकच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे, परंतु रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाही आणि उपलब्ध झाल्यास वाढीव दराने ब्लॅकमध्ये हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे.
जास्तीतजास्त चौदाशे रुपयांचे रेमडेसिवीर इंजेक्शन ब्लॅकमध्ये तीन ते चार हजार रुपयांना बीड शहरामध्ये विक्री होताना दिसून येत आहे. त्यामुळे विनाकारण रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना ही आर्थिक झळ सोसावी लागत आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णास त्याच रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध न झाल्यास ते नेमके कोठे उपलब्ध होईल, याविषयीची दैनंदिन माहिती आपल्या जिल्हा प्रशासनाने प्रति दिवस वर्तमानपत्रांसह इतर माध्यमांतून प्रसिद्ध करावी तरच या इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखला जाईल व हे इंजेक्शन गरजू रुग्णांना शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्ये उपलब्ध होईल. त्यामुळे लवकरात लवकर रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळण्याचे दैनंदिन ठिकाण माध्यमांमधून प्रसिद्ध करावे, अशी मागणी नाईकवाडे यांनी केली आहे. सोबत फारुख पटेल, तुषार घुमरे उपस्थित होते.