अंबाजोगाईत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:21+5:302021-03-10T04:33:21+5:30
या कार्यक्रमास बुलडाणा येथील पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्रा. डाॅ. अनिल मस्के, इन्नरव्हील ...

अंबाजोगाईत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
या कार्यक्रमास बुलडाणा येथील पोलीस उपअधीक्षक रमेश बरकते, स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्रा. डाॅ. अनिल मस्के, इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा, सुदाम आगळे, व्यवस्थापक राम आपेट यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार हे होते.
यांचा झाला सन्मान
पतीच्या पश्चात उद्योग करून जिद्दीने आपले कुटुंब सांभाळणाऱ्या जयश्री माळी, इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्षा अंजली चरखा, डाॅ. सोनाली मस्के, केंद्रप्रमुख सुलभा गोस्वामी, पोलीस कर्मचारी मंदा तांदळे, युवा सामाजिक कार्यकर्ती रचना परदेशी, ॲड. प्रज्ञा लोमटे, ॲड. गीता अंजान, ॲड. जागृती पवार, ज्वेलर्सच्या दालनात काम करणाऱ्या अनिता देशपांडे, शॉर्ट फिल्ममधील युवा कलाकार स्नेहा ठोंबरे, कपडा दालनात काम करणाऱ्या सुमती शेटे यांना शाल, व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
आरती मसलेकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांचे स्वागत राम आपेट यांनी केले. सुलक्षणा पवार यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी नवनाथ बिरंगे, पांडुरंग कुंभार, विशाल क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला.
===Photopath===
090321\avinash mudegaonkar_img-20210309-wa0077_14.jpg
===Caption===
अंबाजोगाईत कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.