अपहरण आणि अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:38 IST2019-01-31T17:36:29+5:302019-01-31T17:38:05+5:30
अटकेची मागणी करत आज लोणावळा फाटा येथे नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.

अपहरण आणि अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी रास्तारोको
गेवराई (बीड ) : तालुक्यातील लोणावळा येथील एका मुलीवर अपहरण करून अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात आठ दिवसांपूर्वी गुन्हा दाखल असून आरोपींना अद्यापही अटक नाही. त्यांच्या अटकेची मागणी करत आज लोणावळा फाटा येथे नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले.
लोणावळा येथील एका मुलीचे गावातुन अपहरण करून अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा गेल्या आठ दिवसा पुर्वी दाखल करण्यात आला मात्र यातील आरोपींना अद्यापही अटक नाही. आरोपींना त्वरित अटक करावी या मागणीसाठी आज दुपारी 12 वाजता तालुक्यातील गढी माजलगावं रोडवरील लोणावळा फाटा येथे लोणावळा, मारफळा सह परिसरातील नागरिकांनी रस्तारोको आंदोलन केले.
आंदोलनात बप्पासाहेब शिर्के, आसाराम शिर्के, सुवर्णा शिर्के, शितल शिर्के, राजश्री शिर्के, संपत शिर्के, रामचंद्र यादव, महादेव शिंगाडे,सखाराम कारेक,शिवाजी कुटे आदींचा सहभाग होता.